छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा; शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनची मागणी
(नंदुरबार) लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या दोषींना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनने केली आहे.
- निवेदन: या घटनेचा निषेध नोंदवत नंदुरबार येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या स्वाभिमान, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असून, या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
- उपस्थित मान्यवर: या निवेदन देताना फाऊंडेशनचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंडीत माळी, काँग्रेस कमिटी ब्लॉकचे अध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह राजेंद्र बुवा, इब्रास शेख, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर आणि आकिब शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Follow Us:

