शहादा-सावखेडा रस्त्यावर भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; साडेचार वर्षीय बालक जागीच ठार, पती-पत्नी जखमी

शहादा तालुक्यातील चांदसैली येथील मुकेश विठ्ठल पावरा हे पत्नी मिनाबाई आणि साडेचार वर्षीय मुलगा अभियांक यांच्यासोबत दुचाकीने (MH 15 HV 2390) शहादा ते सावखेडा रस्त्याने जात होते. सावखेडा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रुग्णवाहिकेने (GJ 19 X 6671) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
  • जीवितहानी व जखमी: या भीषण अपघातात साडेचार वर्षीय अभियांक मुकेश पावरा या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.
  • पोलीस कारवाई: रणजीत विठ्ठल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालक अनिल गोपीचंद राठोड (रा. कढरे, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: