कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा “स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा” उपस्थितीत जल्लोषात संपन्न

पुणे(प्रतिनिधी):-कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्थाचा वार्षिक स्नेहमेळावा सदाशिव पेठ येथील भावे प्राथमिक शाळा येथे बहुसंख्य समाज बांधवांच्या अभूतपूर्व आणि उत्साही उपस्थितीत प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कोकण मराठा समाज एकत्र आला असून समाजाच्या एकजूट आणि प्रगतीचे एक नवे पर्व या माध्यमातून अधोरेखित झाले.
कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा “स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा” उपस्थितीत जल्लोषात संपन्न
The "Get-together and Samajbhushan Award Ceremony" of the Konkan Maratha Navnirman Sevabhavi Sanstha concluded with great enthusiasm.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांची वंदनीय उपस्थिती होय. आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करताना डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांनी कोकणाची समृद्ध परंपरा आणि तेथील घट्ट नातीगोती याबद्दल अगदी आपुलकीने वर्णन केले. “कोकणातील माणूस हा निसर्गासारखाच अगदी साधा, भोळा आणि प्रेमळ असतो”, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आजच्या या सोहळ्यामध्ये डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या शुभहस्ते समाजातील  विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रामचंद्र मोरे, राजेंद्र सोंडकर, शंकर मोरे, बाबाजी मोरे, अरविंद चव्हाण, रमेश मोरे, सुधाकर पाष्टे, प्रकाश मोरे, सौ. अजिता महापदी- जाधव, रोहन मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
समाजाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेच्या वतीने समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट (CA) आणि वकील यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.तसेच,इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महिलांना हळदी कुंकू देऊन सन्मानित करण्यात आले.
आजचा अभूतपूर्व स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी कोकण मराठा समाज पुणेचे अध्यक्ष दत्ता जाधव व सर्व आजी-माजी पदाधिकारी, तसेच कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यश शिंदे, सचिव संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष राजन जाधव, खजिनदार रोहित मोरे,सह खजिनदार मनीष चव्हाण, सह सचिव महेश जाधव, उपाध्यक्ष संतोष भोसले व नितीन मोरे, सहकार्याध्यक्ष महेंद्र जाधव,CA प्रसाद सकपाळ, सागर निकम, प्रवीण कदम, ज्ञानेश शिंदे, किशोर हळदे, विकास चव्हाण, रविकांत मोरे, महेंद्र कदम व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन सुदर्शन जाधव यांनी केले. स्नेहमेळाव्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासह विविध भागांतून बहुसंख्येने समाज बांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250