धमकीचा ईमेल अन् पोलिसांची धावपळ!
(नंदुरबार) न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी न्यायालय इमारत बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. प्राथमिक माहितीनुसार, राज्यभरातील न्यायालयांना 'खालीस्तानी संघटनेच्या' नावाने हे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
- तातडीने तपासणी व न्यायालय रिकामे: धमकी मिळताच न्यायालय प्रशासनाने पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व शहर पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ संपूर्ण न्यायालय परिसर खाली करण्यात आला.
- बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी: पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने न्यायालयातील विविध कक्ष, कार्यालये आणि आजूबाजूच्या परिसराची कडक तपासणी केली.
- नागरिक व कर्मचाऱ्यांचा सुटकेचा श्वास: दुपारपासून ते सायंकाळपर्यंत चाललेल्या या कसून तपासणीत कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन, न्यायालयीन कर्मचारी आणि वकील वर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला. खबरदारी म्हणून न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
Follow Us:

