ग्रामीण तरुणाई आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’चा पुढाकार; कौशल्य प्रशिक्षणासोबतच उद्योगासाठी अर्थसहाय्याची संधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे RSETI अंतर्गत प्रशिक्षित लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करून स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त बँक कर्ज प्रस्ताव सादर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे!
ग्रामीण भागातील तरुणाईला आणि महिलांना रोजगारासोबतच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे।
- अभियानाची ठळक वैशिष्ट्ये:
- कौशल्य विकास – रोजगाराभिमुख कौशल्यांचे दर्जेदार प्रशिक्षण
- उद्योजकता विकास – व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन
- आर्थिक साक्षरता – पैशांचे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन
- डिजिटल व्यवहार – आधुनिक व कॅशलेस व्यवहार पद्धतीचे ज्ञान
- प्रशिक्षण + अर्थसहाय्य = उद्योगाची नवी वाटचाल!
चला, या संधीचा लाभ घेऊया आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनूया!
Follow Us:

