‘विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव!

जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओपन लिंक्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘विनोबा’ ॲप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव समारंभ दि.30/09/2026 रोजी उत्साहात पार पडला.
‘विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव!
Vinoba App District Teacher Award
        ‘पोस्ट ऑफ द मंथ’ आणि ‘मॉर्निंग असेंबली’ या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते, तसेच डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
‘पोस्ट ऑफ द मंथ’चे जिल्हास्तरीय विजेते सीमा बागुल (जि.प. शाळा, पाडळपूर), ऋतिका वाघ (जि.प. शाळा, दलेलपूर), दिलीप बोरसे (जि.प. शाळा, नवेटेंबे) आणि फईम शेख (जि.प. शाळा, अक्कलकुवा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय ‘मॉर्निंग असेंबली’मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशाल पाटील (जि.प. शाळा, अजेपूर) यांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सादरीकरण.
        कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक विषयांवर सादरीकरण केले. प्रदीप अरविंद चौधरी, साक्षी मुंगा वळवी, दर्शना गिरधर मोरे, प्रभात शिवाजी ठाकरे, प्रभात मुंगा वळवी, आरुष अंबालाल मोरे, जयदीप अरविंद चौधरी आणि भाविका अशोक उडवी यांनी वार, ऋतू व दिशा, शाळेतील उपक्रम, भारत व महाराष्ट्राची माहिती, दिनचर्या, म्हणी व अर्थ तसेच शब्दसाखळी यांसारख्या विषयांवर सादरीकरण केले.
यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी गौरवप्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक करून त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी शिक्षकांनी अशाच प्रकारे नवकल्पनांना चालना देत प्रभावी शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच अधिकाधिक शिक्षकांनी आपल्या उपक्रमांच्या पोस्ट ‘विनोबा’ ॲपवर अपलोड कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: