विशेष गरजा असलेल्या बालकांच्या कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन द्या; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – आदिती तटकरे

विशेष गरजा असलेल्या बालकांना कायमस्वरूपी, प्रेमळ आणि आधार देणारे कुटुंब मिळावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. दत्तक प्रक्रियेची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यपूर्ण सहकार्य, जनजागृती आणि सर्व घटकांमधील प्रभावी समन्वय आवश्यक असून दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
विशेष गरजा असलेल्या बालकांच्या कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन द्या; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – आदिती तटकरे
vishesh-garaja-aslelya-balakanchya-kutumbadharit-sangopanala-protsahan-dya-yantrananni-samanvayane-kam-karave-aditi-tatkare

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (सीएआरए) विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या दत्तक प्रक्रियेला आणि कुटुंबाधारित संगोपनाला अधिक बळकटी देण्यासाठी पश्चिम विभागीय चौथी प्रादेशिक सल्लामसलत कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्री तटकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सीएआरएच्या ‘दत्तक जागरूकता अभियान २०२५’ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि राज्य दत्तक संसाधन संस्था (एसएआरए) यांच्या सहाय्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या संस्थाबाह्य पुनर्वसनाला प्रोत्साहन’ ही या अभियानाची संकल्पना आहे. विशेष गरजा असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे कुटुंबाधारित संगोपन आणि दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250