श्राॅफ हायस्कूलला संलग्न श्रीमती चंद्राबेन रामदास बाल मंदिर, येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नंदुरबार:-श्राॅफ हायस्कूलला संलग्न श्रीमती चंद्राबेन रामदास बाल मंदिर, नंदुरबार येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राखी बांधून भाऊ- बहिणीच्या प्रेमाचे व आपुलकीचे महत्त्व जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी सुंदर राख्या तयार करून एकमेकांना बांधल्या.
श्राॅफ हायस्कूलला संलग्न श्रीमती चंद्राबेन रामदास बाल मंदिर, येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा
Raksha Bandhan celebrated with enthusiasm at Smt. Chandraben Ramdas Bal Mandir, affiliated with Shroff High School.

शिक्षकांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेम, स्नेह, काळजी आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेश दिला. रक्षाबंधन निमित्ताने विद्यार्थ्यांनी राख्यांच्या विविध सुंदर कलाकृती सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय संस्थेच्या समन्वयक सौ. सुषमा शाह, मुख्याध्यापिका सौ. पूनम गिरी तसेच सर्व शिक्षक भगिनींना जाते.