नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळाही रडारवर; सेंट्रल किचन प्रणालीत बदल करून ताजे भोजन देणार

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचे ऑडिट केले जाईल, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नियंत्रित आश्रमशाळांचाही समावेश असेल.
नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळाही रडारवर; सेंट्रल किचन प्रणालीत बदल करून ताजे भोजन देणार
ashram-schools-in-nandurbar-on-radar-central-kitchen-system-revamped-for-fresh-meals
  • या बाबींची होणार तपासणी:
    • शाळांचा शैक्षणिक दर्जा.
    • निवास व्यवस्था, भोजन आणि आरोग्य सुविधा.
    • सुरक्षा व्यवस्था.
    • शाळांना मिळणाऱ्या अनुदानाचा वापर नेमका कसा केला जातो याची पडताळणी.

  • कारवाईचा बडगा: थर्ड पार्टी ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांना सुधारणेची एक संधी दिली जाऊ शकते.
  • सेंट्रल किचन प्रणालीत बदल: सध्या सुरू असलेली सेंट्रल किचन प्रणाली तात्काळ बंद न करता, आश्रमशाळा आणि किचन सेंटरमधील अंतर कमी केले जाईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना १० ते २५ मिनिटांच्या आत गरम व ताजे जेवण पोहोचवणे शक्य होईल.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: