जमीन व्यवहारांना डिजिटल बळ; ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
जमीन व्यवहारांना डिजिटल बळ; ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
Digital boost for land transactions; ‘Mahabhumi Stack’ system launched by Chief Minister Fadnavis.

महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकीहक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, आयडीआरएस यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि जमीनविषयक सुधारणामधील हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार
▶️३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (७/१२ व ८-अ)
▶️१.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका
▶️४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख
▶️नोंदणी विभागाचे दस्त क्र. २ च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250