अनाथ, निराधार बालिकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरी केली दिवाळी
(नंदुरबार) महिला व बाल विकास विभागांतर्गत “दिवाळीचा एक दिवस आमच्या समवेत” या उपक्रमांतर्गत रुरल फाउंडेशन संचलित रुक्माबाई बालिकाश्रम, सोरापाडा, ता. अक्कलकुवा येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बालिकांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी बालिकांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्यासंदर्भात माहिती जाणून घेतली. संस्थेतील १७ अनाथ, निराधार, निराश्रित व एक पालक असलेल्या बालिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप**, पोलीस निरीक्षक, अक्कलकुवा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील, अधीक्षिका कविता वळवी, लिपिक दशरथ वळवी तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
समाजातील वंचित व गरजू बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम संवेदनशील प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.
Follow Us:

