नंदुरबारच्या ४ शिक्षकांना ‘विनोबा ॲप’चा गौरव

(नंदुरबार) डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील चार शिक्षकांना ‘विनोबा ॲप’तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित 'पोस्ट ऑफ द मंथ' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नंदुरबारच्या ४ शिक्षकांना ‘विनोबा ॲप’चा गौरव
four-teachers-from-nandurbar-felicitated-with-vinoba-app
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम’ अंतर्गत शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम, अध्यापन साहित्य आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक कृतींचे प्रभावी सादरकीकरण केल्याबद्दल खालील चार शिक्षकांची निवड करण्यात आली:
• विशाल दिलीप पाटील (प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजेपूर)
• गोपाल होनजी गावीत (प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा, ता. शाहदा)
• वृषाली राजू साळवे (प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेर)
• सोनाली रवींद्र पाटील (प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा नारायणपूर)
सन्मान सोहळा आणि उपक्रमाचे महत्त्व.
हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विजेत्या शिक्षकांना सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. यावेळी बालेर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी धनश्री किशोर पाटील हिने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याविषयी ओघवत्या भाषेत भाषण सादर केले. तसेच विनोबा ॲपचे जिल्हा प्रोजेक्ट ऑफिसर यश पांडे हेदेखील उपस्थित होते.
पुणे येथील ‘ओपन लिंक्स फाऊंडेशन’च्या सहकार्याने नंदुरबार जिल्हा परिषदेने ‘विनोबा’ हे विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी, कृतीशील व गुणवत्तापूर्ण बनवण्यास मदत होत आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: