बुटात किंवा कुंडीत चावी ठेवून गावाला जाताय? दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरफोडीच्या वाढत्या धोक्यापासून सावध राहा!
(नंदुरबार) अनेक नागरिक घराबाहेर पडताना चावी बुट, कुंडी, पायपुसणीखाली किंवा वीज मीटरच्या खोक्यात लपवून ठेवतात. चोरांना या ठरलेल्या जागांचा पक्का अभ्यास असतो, त्यामुळे अशा चुका टाळाव्यात.
- सोशल मीडियावरील स्टेटसचा धोका: व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर ‘वे टू कोकण’, ‘वे टू गाव’ किंवा फॅमिलीचे फोटो व लाईव्ह लोकेशन शेअर करणे टाळावे. यामुळे घर किती दिवस बंद राहणार आहे याची अचूक माहिती चोरांपर्यंत सहज पोहोचते.
- सुरक्षेसाठी पोलिसांचे आवाहन: गावाला जाताना जवळच्या पोलीस स्टेशनला लेखी किंवा फोन करून घराच्या अनुपस्थितीची माहिती द्यावी, जेणेकरून त्या भागात पोलिसांची गस्त वाढवता येईल.
- स्मार्ट सुरक्षेच्या टिप्स:
- घराला दर्जेदार कुलूप आणि अलार्म बसवावा.
- सीसीटीव्ही कॅमेरा थेट मोबाईलशी कनेक्ट केलेला असावा, जेणेकरून संशयास्पद हालचाल झाल्यास तात्काळ अलर्ट मिळेल.
Follow Us:

