दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत मंत्री पंकजा मुंडे साजरी करणार भाऊबीज

मुंबई: पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे उद्याची दिवाळी भाऊबीज दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजूरांसमवेत साजरी करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांच्या पालावर त्या जाणार आहेत.
दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत मंत्री पंकजा मुंडे साजरी करणार भाऊबीज
Drought Impact: Minister Pankaja Munde to Celebrate Bhau Bhaubeej with Migrant Sugarcane Cutters

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ऊसतोड कामगारांचे जगणे तर अधिकच संघर्षमय झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या वाट्याला आनंदाचे क्षण यावेत, त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते अधिक घट्ट व्हावे, या भावनेतून यंदाची भाऊबीज ऊसतोड कामगार व शेतकऱ्यांसोबत साजरी करणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी  नुकतेच जाहीर केले होते, त्यानुसार उद्या सायंकाळी ४ वाजता त्या संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई- दारूंब्रे ता. मुळशी जि. पुणे येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन भाऊबीज करणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: