एस.ए.मिशन हायस्कूल,नंदुरबार येथे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ई-कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती मोहीम

नंदुरबार:-भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत ‘Eco Clubs for Mission LiFE’ उपक्रमाच्या माध्यमातून आणि 28 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील शाळांमध्ये ई- कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट या विशेष अभियानांतर्गत
एस.ए.मिशन हायस्कूल,नंदुरबार येथे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ई-कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती मोहीम
e-waste-management-awareness-campaign-environmental-protection-sa-mission-high-school-nandurbar

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे नुकताच अत्यंत उत्साहात ‘ई-कचरा संकलन उपक्रम’ (E- Waste Collection Drive) पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या ई-कचऱ्याची समस्या लक्षात घेता, पर्यावरण संरक्षणाचा वसा जपत विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांची विशेष उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी भूषवले. याशिवाय उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा आणि पर्यवेक्षक मनिष पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यात आली. उपक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागाचे शिक्षक गौतम सोनवणे आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका प्रा. पल्लवी पोळ यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे फायदे, त्याचे महत्त्व आणि पर्यावरणावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. घरातील जुने मोबाईल, खराब झालेले चार्जर, निरुपयोगी वायर्स, की-बोर्ड, माऊस आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे कचऱ्यात न फेकता कशी स्वतंत्रपणे जमा करावीत, याबाबत मोलाची माहिती देण्यात आली. प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की,                     “आजच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमालीचा वाढला आहे, मात्र त्यातून निर्माण होणारा ई-कचरा निसर्गासाठी मोठा धोका ठरत आहे. भविष्यातील पिढीसाठी पर्यावरण निरोगी ठेवण्याकरिता अशा प्रकारच्या संकलन मोहिमा राबविणे अत्यंत गरजेचे आहे.” त्यांनी हा उपक्रम राबवण्यामागची भूमिका अतिशय समर्पक शब्दांत स्पष्ट केली.
उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना  ई-कचऱ्याच्या शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि योग्य ई-कचरा व्यवस्थापनाविषयी मोठी जनजागृती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी जुना व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक कचरा सुरक्षितपणे संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा परिवार आणि शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे व प्रा. पल्लवी पोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनिष पाडवी यांनी मानले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: