विज्ञापित

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ अद्ययावत करा; DDO अधिकाऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती १ जुलै २०२६ हा संदर्भ दिनांक निश्चित करून ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६’मध्ये अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त विनोद धनगर यांनी केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ अद्ययावत करा; DDO अधिकाऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
extension-for-applications-oilseed-pulse-processing-units-apply-by-october-15-2

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ अद्ययावत करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती भरण्याच्या सूचना तसेच आवश्यक माहिती कशा पद्धतीने भरावी, याबाबतचा तक्ता संबंधित DDO लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसारच माहिती भरावी, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विज्ञापित

मागील वर्षाचे युजर आयडी-पासवर्ड कायम

माहिती अद्ययावत करण्यासाठी मागील वर्षीचे युजर आयडी आणि पासवर्ड कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या कार्यालयांना लॉगिन आयडी किंवा पासवर्डची आवश्यकता असल्यास संबंधित कार्यालयाची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर करून ते प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणपत्राशिवाय वेतन देयक स्वीकारले जाणार नाही

या प्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, नोव्हेंबर २०२६ मध्ये देय आणि डिसेंबर २०२६ मध्ये अदा होणारे वेतन देयक कोषागार कार्यालयात सादर करताना शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ अद्ययावत केल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

संबंधित प्रमाणपत्र जोडल्याशिवाय वेतन देयक कोषागार कार्यालयात स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व DDO अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती विहित मुदतीत अचूकपणे अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नंदुरबार, नवीन नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नंदुरबार येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००४४ किंवा सांख्यिकी सहायक मदन मोरे (मोबाईल क्र. ९८३४८६०४९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे उपआयुक्त विनोद धनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: