रोजगारासह चारा उपलब्धतेचे नियोजन करावे – मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ

(नंदुरबार) जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रोजगार, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींना प्राधान्य देऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
रोजगारासह चारा उपलब्धतेचे नियोजन करावे – मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ
hasan-mushrif-employment-fodder-availability-planning
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मा.आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत मिळावी, पंचनामे व मदतवाटपात दिरंगाई होऊ नये, तसेच खासगी सावकारांविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
 संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण, शेततळे, जलतारा, बंधारे दुरुस्ती आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा आणि रोजगार हमीच्या कामांतून स्थानिक रोजगार उपलब्ध करून मजुरांचे स्थलांतर रोखावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: