राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), व अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदय तपासणी व निदानासाठी मोफत विशेष 2D ईको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील महिला रुग्णालय, पहिला मजला, डी.ई.आय.सी. विभाग, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाशी संबंधित आजारांचे निदान व तपासणी बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. व हृदय तपासणी व निदान झाल्यानंतर हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया देखील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK व इतर शासकीय योजनेतून मोफत पूर्ण करण्यात येणार आहेत. बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचे निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विनय सोनवणे यांनी सांगितले आहे.
तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या बालकांची वेळेत हृदयाची तपासणी करून या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, तालुक्यातील आर.बी.एस.के पथकांशी संपर्क साधावा, व नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.विनय सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल तसेच RBSK विभाग नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त बालकांना शिबिरासाठी पाठवावे ही विनंती.![]()
#RBSK#NationalChildHealthProgram#FreeHealthCamp#2DEchoCamp#ChildHeartCheckup#HealthyChild#Nandurbar#DistrictHospitalNandurbar#ApolloHospital#ChildHealthcare#HeartCheckup#GovernmentInitiative#HealthForChildren#FreeMedicalCamp#NandurbarUpdates
















