गडहिंग्लज-कागल नगरपरिषदांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३६८ कोटींचा निधी; मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडहिंग्लज नगरपरिषदेसाठी १९० कोटी रुपये, तर कागल नगरपरिषदेसाठी १७८ कोटी, अशा एकूण ३६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गडहिंग्लज व कागल नगरपरिषदांच्या हद्दीत वापरलेल्या पाण्याच्या (सांडपाणी) प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधीची तरतूद नगरविकास विभागाने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीत दोन्ही नगरपरिषदांमधील वापरलेल्या पाण्याचे संकलन, प्रक्रिया व योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस माजी नगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते
Follow Us:

