स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

(नंदुरबार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी येत्या 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आपले परिपूर्ण अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
swadhar-yojana-arjasathi-15-september-paryant-vidyarthyanna-sandhi

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच त्यानंतरच्या विविध व्यावसायिक व बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये नंदुरबार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज सादर करण्यासाठी मुख्य बाबी:
• पात्रता: शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता 2025-26 मधील पात्र विद्यार्थी तसेच ज्या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
• वसतिगृह प्रवेश: याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी देखील 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
• अर्ज करण्याची पद्धत: पात्र विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत.
मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने, सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री. वसावे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250