कोळदे येथे ९८.७ मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन
नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे ९८.७ मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे विधिवत भूमिपूजन संपन्न झाले. या समारंभास मा. जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी उपस्थित राहून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.
सुझलॉन व गेल यांच्या संयुक्त सहभागातून साकार होणारा हा प्रकल्प नंदुरबार जिल्ह्याच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
पवन ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ व हरित ऊर्जानिर्मितीस चालना मिळणार असून, महाराष्ट्राच्या पवन ऊर्जा क्षेत्रातील नंदुरबारचे योगदान अधिक बळकट होईल. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ ऊर्जा आणि हरित विकासाच्या दृष्टिकोनालाया प्रकल्पामुळे मोठा हातभार लागणार आहे.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, सामाजिक विकास आणि आर्थिक संधी वाढण्यास मदत होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्वच्छ ऊर्जा • हरित नंदुरबार • शाश्वत विकास

