विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न
उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार विद्यालयाचे पर्यवेक्षक टीका पाडवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील हिंदी शिक्षक महेंद्र गिरासे यांनी केले, कार्यक्रमात त्यांनी हिंदी दिन साजरा करण्यामागची भूमिका विशद केली तसेच वर्षभर विद्यालयात हिंदी भाषेसंदर्भात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक व संतांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या साहित्यातले महत्त्वपूर्ण भाग सादर केले. हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करणारे नृत्य तथा नाटिकाही सादर करण्यात आले. कार्यक्रमात संत मीराबाईंची भूमिका कु. रूतिका वसईकर, कबीरदासांची भूमिका आदित्य ब्राह्मणे, तुलसीदासांची भूमिका मेहुल धनगर भारत मातेची भूमिका प्रांजल पाटील आणि भगवान कृष्णाची भूमिका श्लोक भोसले या बालसाहित्यकारांनी साकारली व उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील एकूण वीस विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करणारी मनोगत व कविता गायन सादर करून हिंदी भाषेची महती गायली.
या कार्यक्रमात विद्यालयातील इ- 5 वी (ई) व (फ) च्या तसेच इयत्ता सातवी ई सातवी फ या वर्गातील विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य आणि अभिनयाद्वारे कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
अनिल लोहार यांनी हिंदी भाषेचे जीवनातील स्थान व महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयातील सौंदर्या साळुंके व रिद्धिमा मालचे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयातील जेष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, संतोष पाटील, अजित लांडगे, अनिल लोहार, जकु गावीत, गौरीशंकर धुमाळ, नितीन पाटील, सुनील वळवी आदि मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे आभार अन्सार शेख यांनी मानले.

