विज्ञापित

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

देवळाली:-श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा
hindi-diwas-celebration-at-chhatrapati-shivaji-school-deolali-pravara

विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या हिंदी विषय समितीचे अध्यक्ष शेख व हिंदी विषय समितीच्या सर्व सदस्यांनी केले होते. विद्यालयाचे प्राचार्य रायते यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्या श्रीमती दिघे, पर्यवेक्षक डोफे व साबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख, तातळे, धाडगे, कल्हापुरे दरेकर श्रीमती शेळके श्रीमती शिंदे श्रीम शेख यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंदी दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: