हिंजवडीतील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे येथे हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करुन त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हिंजवडीतील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
hinjewadi-civic-issues-time-bound-action-plan-sunetra-pawar

आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250