स्व. हिरालालकाका चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान ‘हिरा प्रेरणा महोत्सव’

(नंदुरबार) येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था, हिरा उद्योग समूह आणि तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हिरालालकाका मंगलाल चौधरी यांच्या जयंतीनिमित्त **‘हिरा प्रेरणा महोत्सव २०२६ पर्व-१’**चे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान विविध क्रीडा, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसह युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्व. हिरालालकाका चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान ‘हिरा प्रेरणा महोत्सव’
hira-prerna-mahotsav-september-6-to-12-hiralalkaka-chaudhary-jayanti

महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची भावना बळकट व्हावी, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

६ सप्टेंबर रोजी १३ वर्षांआतील तसेच खुल्या गटासाठी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. ७ सप्टेंबर रोजी १४, १७ व १९ वर्षांआतील मुला-मुलींसाठी व्हॉलीबॉल पासिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर रोजी इयत्ता ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, तसेच इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

९ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुल्या गटातील वादविवाद स्पर्धा होईल. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी खुल्या गटासाठी व्हॉलीबॉल शॉर्टी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना १५ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण करण्यात येणार असून, याच दिवशी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच १४ सप्टेंबर रोजी स्व. हिरालालकाका चौधरी यांच्या जयंतीदिनी सकाळी ८ वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, नंदुरबार तैलिक समाजाच्या वतीने गजानन महाराज मंदिरात सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये, खेळाडू तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250