राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांचे निर्देश
(नंदुरबार) सफाई कामगारांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
तसेच सफाई कामगारांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सफाई कामगारांच्या सुरक्षितता, आरोग्य, निवास, विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पात्र सफाई कामगारांना आयुष्मान कार्ड व नमस्ते कार्ड उपलब्ध करून देणे, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक प्रशिक्षण, निवासस्थानांचे स्ट्रक्चरल ऑडिट, प्रलंबित सेवा विषयक प्रकरणांचा निपटारा तसेच पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून त्यांना सुरक्षित कार्यपरिसर, समानतेची वागणूक आणि सन्मानाचे जीवन मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे श्री. कलोसे यांनी नमूद केले.
Follow Us:

