जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या
मुंबई : महाराष्ट्र लोकभवनातील दरबार हॉल भक्तिरसात न्हाऊन निघाला. जन्माष्टमीचे औचित्य साधून भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजनांचा कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जलोटा यांनी कृष्ण भजनासह इतर लोकप्रिय भजन सादर केले.

कार्यक्रमाला अभिनेते शेखर सुमन, रुपिणी महुआकर, अंजन श्रीवास्तव, संध्या पुरेचा, ब्रह्माकुमारी रुक्मिणीबेन, रामकृष्ण मठातील स्वामी दयाधीपानंद, स्वामी कल्याणात्मानंद, न्या. के के तातेड (सेवानिवृत्त), न्या. मदन गोसावी (से.नि.), डॉ. नरेंद्र जाधव, संदीप सोपारकर, गायिका इला अरुण, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सिद्धार्थ काक, विवेक वासवानी, संदीप महावीर, शांतिप्रिया आदी उपस्थित होते.
राज्यपालांनी अनुप जलोटा तसेच त्यांच्या सहकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यपालांच्या खासगी सचिव अर्चना गायकवाड यांनी केले.
Follow Us:

