जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी शासनाकडून निधीतून विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत असून, पूर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा नंदुरबार जिल्ह्याचे मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
खेळाडूंसाठी तळमजला व तीन मजल्यांचे नवीन वसतिगृह उभारण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये 200 खेळाडूंच्या निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यासोबतच जुन्या बॅडमिंटन हॉल, वसतिगृह आणि शूटिंग रेंजची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, मातीच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
या सुविधांमुळे नंदुरबारच्या खेळाडूंना सराव, प्रशिक्षण, निवास आणि प्रशासकीय सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होऊन क्रीडा क्षेत्राला नवी चालना मिळणार आहे.
Follow Us:

