श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘मुरलीचे सूर’; यशवंत नाट्य मंदिरात रंगणार कृष्णगीतांची सुरेल मैफल
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कृष्णगीतांवर आधारित ‘मुरलीचे सूर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
श्रीकृष्णाच्या जीवनाशी तसेच त्यांच्या बासरीच्या सुरांशी जोडलेल्या कृष्णगीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमात नचिकेत देसाई, स्वरा जोशी आणि केतकी भावे-जोशी यांचे सादरीकरण होणार असून, अनघा मोडक निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत.

