राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेल्या गणेशोत्सवासाठी विशेष स्पर्धा; मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. २०२६ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250