नरडवे प्रकल्पबाधित १५२ कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी ६.८३ कोटींचे अनुदान मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील #नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात विशेष पाठपुरावा केल्याचेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
नरडवे प्रकल्पबाधित १५२ कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी ६.८३ कोटींचे अनुदान मंजूर
Nardave Dam Project Affected Families Get Rs 6.83 Crore Rehabilitation Grant

या प्रकल्पामुळे नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगर ही पाच गावे बाधित झाली आहेत. एकूण ९६१ प्रकल्पबाधित कुटुंबांपैकी १५२ कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला आहे. मंजूर अनुदानामध्ये घरांसाठी ६ कोटी ५५ लाख १५ हजार ७२० रुपये, तर जमिनीबाबत २७ लाख ८६ हजार १६७ रुपये अनुदानाचा समावेश आहे. नरडवे येथील ८४, जांभळगाव येथील १६, भैरवगाव येथील २, यवतेश्वर येथील ४ आणि दुगनगर येथील ४६ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250