लियो लायन्स क्लब, नंदुरबारच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

मुख्य पदाधिकारी निवड: लियो लायन्स क्लब नंदुरबार सुप्रिमो क्लबच्या अध्यक्षपदी धनश्री कोतवाल, सचिवपदी मानस्वी चौधरी आणि ट्रेझरर (कोषाध्यक्ष) पदी आगम शाह यांची निवड करण्यात आली आहे.
  • प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यासाठी लायन्स डिस्ट्रिक्टच्या उपप्रांतपाल सुप्रिया कोतवाल यांनी ‘इस्टालीन ऑफिसर’ म्हणून तर झोन चेअरमन पिनल शाह यांनी ‘इंडक्शन ऑफिसर’ म्हणून काम पाहिले.
  • मार्गदर्शन: सुप्रिया कोतवाल यांनी लायन्स क्लबच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली, तर पिनल शाह यांनी उपस्थितांना शैक्षणिक क्षेत्रात करिअर वाढविण्याचे आवाहन केले.
  • इतर उपस्थित सदस्य: या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा रागिणी पाटील, सचिव चेतना गोस्वामी, ट्रेझरर किरण गायकवाड यांच्यासह हिना रघुवंशी, शितल चौधरी, रंजना बोरसे, सारीका जमादार, जया जैन, तेजल जयेश चौधरी, नेहा पारेख आणि मेघना परदेशी आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार धनश्री कोतवाल यांनी मानले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: