विज्ञापित

मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’ गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन बुधवार, १६ सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आले आहे

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक व्यापक बाजारपेठ, दर्जेदार प्रक्रिया सुविधा आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा मॅग्नेट २.० प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी भक्कम मूल्यसाखळी उभारण्याचे काम या प्रकल्पातून केले जात आहे.
मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’ गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन बुधवार, १६ सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आले आहे
magnet-agribusiness-infrastructure-investor-meet-mumbai-september-16

मॅग्नेट २.० अंतर्गत ‘हब-ॲण्ड -स्पोक’ मॉडेलवर आधारित मोठ्या प्रमाणावर कृषी-व्यवसाय पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधांमुळे शेतमालाची नासाडी कमी होण्यासह अधिक चांगल्या बाजारपेठा, मूल्यवर्धनाच्या संधी आणि निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि रिटेल क्षेत्र यांना एका मूल्यसाखळीत जोडण्याचे कामही या माध्यमातून होणार आहे – मंत्री जयकुमार रावल

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: