महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची ‘डायट’ नंदुरबारला सदिच्छा भेट

नंदुरबार:-येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस (DIET) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची ‘डायट’ नंदुरबारला सदिच्छा भेट
maharashtra-rajya-pariksha-parishadeche-adhyaksh-dr-nandkumar-bedse-yanchi-diet-nandurbarla-sadichha-bhet

यावेळी त्यांनी संस्थेतील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्या सोबत संवाद साधत परीक्षा परिषदेच्या विविध परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढवणे आणि जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकासावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या गुणवत्ता विषयक निपुण महाराष्ट्र कार्यक्रम, पीजीआय, PAT, परख या सह विविध विषयांवर चर्चा केली. डायट नंदुरबार येथील संगणक लॅब मध्ये झालेल्या टंककलेखन परीक्षा उत्कृष्ठ आयोजनाबद्दल प्रशंसा केली.
या बैठकीस प्राचार्य डॉ. दीपक साळवे, वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती प्रतिभा भावसार, डॉ. रमेश चौधरी, अधिव्याख्याता प्रदीप पाटील, विनोद लवांडे, चंद्रकांत पवार, धुळे डायटचे अधिव्याख्याता सुभाष वसावे व विषय सहायक देवेंद्र बोरसे उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250