धरणांच्या गाळात मका, ज्वारी, बाजरी पीक घेणार; जलसंधारण विभाग जागा उपलब्ध करून देणार
नंदुरबार जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलाशय आणि तलावांमधील लागवडीयोग्य गाळपेरा क्षेत्र शेतकरी व पशुपालकांना अल्पकालीन चारा पिकांच्या लागवडीसाठी भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देणार आहे.
-
- पिके: या क्षेत्रात मका, ज्वारी, बाजरी, न्यूट्रिफीड, बरसीम, ओट आदी चारा पिके घेता येतील. मुरघासासाठी मका आणि ज्वारीला प्राधान्य दिले जाईल.
- प्रतिबंध: ऊस, फळपिके, बहुवार्षिक पिके तसेच अन्नधान्य किंवा नगदी पिके घेता येणार नाहीत.
- रासायनिक खतांवर बंदी: पाण्याच्या स्रोतांच्या सुरक्षिततेसाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर असलेल्या लागवडीला परवानगी मिळणार नाही.
- मुदत: लाभार्थ्यांना पीक काढणी पूर्ण करून ३१ मे पूर्वी जमीन विभागाला परत करावी लागेल.
- नुकसान भरपाई नाही: पाणीपातळी वाढल्यास व पीक बुडाल्यास कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. तसेच सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.
- मशागत: जमिनीची मशागत कमाल २० सेंटिमीटर खोलीपर्यंत करता येईल. गाळ, माती, वाळू उपसा करणे किंवा नवीन विहीर, बोअरवेल, शेततळे, कुंपण, पक्के बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे.
- अर्ज प्रक्रिया: तहसीलदार उपलब्ध क्षेत्र, भाडेपट्ट्याचा कालावधी आणि दर जाहीर करतील. अर्जदारांना ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात १५ दिवसांच्या मुदतीत अर्ज करावा लागेल. इच्छुकांना निवासी दाखला, जमीनधारणेचे उतारे किंवा भूमिहीन दाखला आणि पशुधनविषयक कागदपत्रे जोडून संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल.
Follow Us:

