“माझं गाव आरोग्य संपन्न गाव” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न!

पंचायत समिती सभागृह, नंदुरबार येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. नंदुरबार), मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे व मा. सह-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निपटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
“माझं गाव आरोग्य संपन्न गाव” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न!
my-village-healthy-village-taluka-level-workshop-concluded
नंदुरबार)पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, अर्चना वाघमळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक व मुद्दे:
• ध्येय आणि उद्दिष्टे: गटविकास अधिकारी, अर्चना वाघमळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पवार व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे आणि करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
• आरोग्य व प्रतिबंधात्मक उपाय: गाव पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना उत्तम दर्जाची गुणात्मक आरोग्य सेवा देण्याबाबत चर्चा झाली.
• शासन निर्णय: १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत मा. तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना भामरे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
उपस्थिती:
या कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहायिका उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: