जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची BNF EPDS उत्पादन युनिटला भेट
(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन (BNF) च्या EPDS उत्पादन युनिटला भेट देऊन युनिटच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी BNF आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पोषण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील MAM (मध्यम तीव्रतेच्या कुपोषणाची) बालकांना पोषणपूरक आहाराचा पुरवठा सुरू करण्यासाठी युनिटची तयारी, उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि आवश्यक कार्यवाहीची सज्जता यांचे मूल्यांकन करण्यात आले.
बालकांचे पोषण सुधारण्यासाठी प्रशासन, संबंधित संस्था आणि क्षेत्रीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
कुपोषणमुक्त नंदुरबारच्या दिशेने जिल्हा प्रशासनाचा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम!
Follow Us:

