विज्ञापित

आपली पृथ्वी, आपला ओझोन! अण्णासाहेब पी. के. पाटील विद्यालयात रंगला ‘ओझोन संवाद २०२६’; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाने विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा निर्धार

(नंदुरबार) वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा बिघडणारा समतोल रोखण्यासाठी केवळ कायदे किंवा सरकारी यंत्रणा पुरेशा नाहीत; तर यासाठी नव्या पिढीमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची रुजवणूक होणे काळाची गरज आहे याच उदात्त ध्येयाने नंदुरबार येथील सहकारमहर्षी श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाचे औचित्य साधून 'ओझोन संवाद २०२६' या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
आपली पृथ्वी, आपला ओझोन! अण्णासाहेब पी. के. पाटील विद्यालयात रंगला ‘ओझोन संवाद २०२६’; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाने विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा निर्धार
ozone-samvad-2026-annasaheb-pk-patil-school-ek-ped-maa-ke-naam
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी, दिनविशेष समिती प्रमुख तथा विज्ञान शिक्षक सुरेंद्र पाटील आणि ज्येष्ठ शिक्षिका चेतना चौधरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
त्यानंतर विज्ञान शिक्षक सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओझोन संवाद २०२६ – जाणून घेऊया ओझोनला, जपूया आपल्या पृथ्वीला’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ओझोन थराचे महत्त्व, पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण, हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर आपले विचार मांडले.
 “ओझोन वाचवण्यासाठी ‘खारुताईचा वाटा’ उचला!” — मुख्याध्यापक अनिल चौधरी यांचे आवाहन
कार्यक्रम अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे भावुक आवाहन केले
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये व संदेश
  • पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश: ओझोन थराला पडणारे छिद्र रोखण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्लास्टिक टाळणे व निसर्गपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.
  • वैज्ञानिक दृष्टीकोन आणि कुतूहल: विज्ञान विषयाची आवड निर्माण करून पर्यावरणातील समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
  • प्रत्यक्ष कृतीवर भर: केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प करण्यात आला
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: