आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत

राजापूर :-युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. दोन रिफिल सिलेंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी 45 दिवसांवरून कमी करून 25 दिवस करण्यात आल्याची माहिती आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
आ.प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी यांच्या सिलेंडर पुरवठा पूर्ववत
pramod-jathar-pathpuravyamule-kokanatil-grameen-bhagat-gharguti-lpg-cylinder-puravatha-purvavat

या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः संयुक्त कुटुंब पद्धती, घरातील अधिक सदस्यसंख्या तसेच ग्रामीण भागातील इतर व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता एका सिलेंडरवर तब्बल 45 दिवसांचा कालावधी पूर्ण करणे अनेक कुटुंबांसाठी अत्यंत कठीण ठरत होते. आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील ग्रामीण भागात चाकरमानी व कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येत असल्याने घरगुती एलपीजीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हजारो ग्रामीण एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण कुटुंबांची स्वयंपाकाच्या इंधनाची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे. आ. प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश कोकणातील ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक ठरले असून गणेशोत्सवाच्या काळात घरगुती एलपीजी पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250