महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विभागाची मोठी अधिसूचना; राज्यामध्ये ‘महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद’ स्थापन!
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी कृषी अधिकारी (विस्तार) यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित क्षेत्रासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची अपील अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद’ स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असून उपमुख्यमंत्री तसेच कृषी, महिला व बालविकास, ग्रामविकास, सहकार, पशुसंवर्धन, वित्त, वन, महसूल आणि नगरविकास आदी विभागांचे मंत्री सदस्य असतील. कृषी विभागाचे सचिव सदस्य-सचिव असतील.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

