१६ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन

नंदुरबार, जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करून न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
१६ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन
Women's Democratic Day to be held in Nandurbar on Nov 16
त्यानुसार नोव्हेंबर २०२६ महिन्यातील महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलांनी आपल्या तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी तक्रार अर्जासह दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील रंगावली सभागृहात स्वतः उपस्थित राहावे.
 तसेच ऑनलाइन पद्धतीने तक्रार मांडण्यासाठी खालील लिंकवर दुपारी १ ते २ या वेळेत सहभागी होता येईल.
  •  महत्त्वाच्या सूचना :
▪️ तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात.
▪️ न्यायप्रविष्ट व आस्थापनाविषयक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
▪️ सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
महिलांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या समस्या व तक्रारी प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: