मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध गणेशोत्सव मंडळांना भेट
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी नागपुरातील विविध गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन ‘श्रीं’च्या मूर्तीचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अजनी चौक येथे मुख्यमंत्र्यांनी आशीर्वादाचा दीप प्रज्वलित केला तसेच अजनी चौक मंडळाच्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांना मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
विज्ञापित
विवेकानंद नगर गणेश उत्सव मंडळ, राणी लक्ष्मीबाई गणेश उत्सव मंडळ लक्ष्मीनगर, अभ्यंकर नगर सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, विघ्नहर्ता उत्सव समिती व्हीएनआयटी, बालगणेश उत्सव मंडळ प्रतापनगर, श्रीनगर बालगणेश उत्सव मंडळ, लोकमान्य गणेश उत्सव मंडळ सुभाषनगर, बळ गणेश उत्सव मंडळ द्रोणाचार्य नगर, युवक गणेश उत्सव मंडळ त्रिमूर्ती नगर, सिद्धी विनायक गणेश उत्सव मंडळ एकात्मता नगर, श्री सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ भेंडे लेआऊट येथे भेट देऊन ‘श्रीं’चे मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. विविध मंडळांनी उभारलेल्या आकर्षक देखाव्यांची त्यांनी प्रशंसा केली.
विज्ञापित
Follow Us:

