विज्ञापित

नंदुरबारमध्ये २१ सप्टेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

नंदुरबार : महिलांच्या समस्या, हक्क आणि न्यायासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील संग्रामली सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
नंदुरबारमध्ये २१ सप्टेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
21-september-jilhastriya-mahila-lokshahi-din

जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमातून नंदुरबार जिल्ह्यातील समस्या व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विज्ञापित

महिला लोकशाही दिनाला ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी होता येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने Google Meet ची लिंक उपलब्ध करून दिली असून, दुपारी १ ते २ या वेळेत तक्रारी मांडता येणार आहेत.

कोण सहभागी होऊ शकतात?

नंदुरबार जिल्ह्यातील समस्या असलेल्या तसेच पीडित महिलांना या उपक्रमात आपले प्रश्न मांडता येतील. महिलांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

तक्रारदार महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • तक्रारदार महिलेची तक्रार वैयक्तिक असावी.
  • न्यायालयीन व आश्रयासंबंधी विषयक तसेच सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी मान्य नसतील.
  • दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो, अशी माहिती प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही संधी असल्याने संबंधित महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: