मिशन हायस्कूलमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती

नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातंतर्गत ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ अभियानांतर्गत 'ई-कचरा संकलन' उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
मिशन हायस्कूलमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती
e-waste-management-awareness-campaign-held-at-mission-high-school
  • विद्यार्थ्यांचा सहभाग: या मोहिमेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी घरातील जुने मोबाईल, खराब झालेले चार्जर, निरुपयोगी वायर्स, की-बोर्ड, माऊस इत्यादी ई-कचऱ्याचे संकलन केले.
  • प्रमुख मार्गदर्शन:
      • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी होत्या. त्यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला असला तरी त्यातून निर्माण होणारा ई-कचरा निसर्गासाठी मोठा धोका ठरत आहे.
      • उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी भविष्यातील पिढीसाठी पर्यावरण निरोगी ठेवण्याकरिता अशा मोहिमांची गरज अधोरेखित केली आणि ई-कचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीबाबत माहिती दिली.
      • गौतम सोनवणे व प्रा. पल्लवी पोल यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे फायदे, महत्त्व आणि पर्यावरणावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

  • उपस्थिती: या प्रसंगी उपमुख्यध्यापक विजय पवार, वंदना जांबिलसा, मनीष पाडवी आदी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: