सकाळी गारव्याचा दिलासा, दुपारी चटके देणारे ऊन तर सायंकाळी उकाडा करतोय हैराण!
नंदुरबारमध्ये सध्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव येत आहे. पहाटे गारवा जाणवतो, दुपारी कडक ऊन पडते तर सायंकाळी आद्रतेमुळे (ह्युमिडिटी) असह्य उकाडा होतो. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही अपेक्षित थंडी पडलेली नाही.
- थंडी लांबण्याची कारणे: हवामान तज्ज्ञांनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी अद्याप वेग पकडलेला नाही. त्यातच गेल्या १५ दिवसांत पूर्वेकडे दोन चक्रीवादळे निर्माण झाल्यामुळे पूर्वेकडील हवेचा रोध उत्तरेकडील थंड हवेला होत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने धरणांमधील जलसाठा कमी आहे, त्यामुळेही थंडीची तीव्रता जाणवत नाहीये. मात्र, येत्या ८ दिवसांत थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
- साथीचे आजार वाढले: दिवसभरातील या लहरी हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील काही भागांत डेंग्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.
- वैद्यकीय सल्ला: बदलत्या हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करताना मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Follow Us:

