रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार:-शहरातील श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ व जय अंबे गरबा मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदानातून माणुसकीचा संदेश, श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या ब्रीदवाक्याला कृतीची जोड देत अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विशेष म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांपुरता हा उपक्रम मर्यादित न राहता परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता निर्माण करण्याबरोबरच समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रक्तदात्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे परिसरात सामाजिक कार्याची एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती.

‘आपले काही थेंब रक्त, एखाद्याला देऊ शकते नवजीवन’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाने जपली आहे. रक्तदान शिबिराला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद ही त्याच सामाजिक जाणिवेची प्रचिती ठरली. रक्तदात्यांसह शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: