नंदुरबार जिल्ह्यात तीन दुचाकी चोरी; नंदुरबार, नवापूर व तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात तीन दुचाकी चोरी; नंदुरबार, नवापूर व तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
nandurbar-district-three-two-wheeler-thefts-cases-registered-nandurbar-navapur-taloda-police-stations

        नंदुरबार तालुक्यातील भोये येथील सतीश सोनेराव पाटील यांनी नंदुरबार येथील शेती संघ कार्यालयासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

        दरम्यान, नवापूर तालुक्यातील आमापाडा येथील अलेश कच्या गावित यांनी नवापूर शहरातील बाजार समितीजवळ उभी केलेली दुचाकीही चोरीला गेली. याप्रकरणी नवापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: