साव-यादिगर येथे वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला
दगड,माती, वाळू नाल्यात आणून सदर बंधारा 15 मीटर लांबीचा बांधण्यात आला. यंदा पावसाळा अत्यल्प झाल्याने स्थानिक नदी, नाले आटण्यास सुरुवात होऊ लागली आहे. त्यामुळे आता जे नाले जीवंत आहेत त्यातील पाणी वनराई बंधारे बांधून पाणी अडविले पाहीजे या हेतूने वनविभागाने सदर कार्यक्रम हाती घेतला असून, श्रमदानातून वनराई बंधारे व पाणवठे बांधून वन्यप्राणी, पशूपक्षी यांना पाण्याची सोय करण्यात येत आहे, व स्थानिक गुरे ढोरे यांना देखील तहान भागवण्यासाठी वनराई बंधा-याची मदत होणार आहे. सदर बंधाऱ्याचे काम केल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमात सरपंच दिलीप पावरा, माजी सरपंच राड्या पावरा, माजी पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा, पोलीस पाटील पोडया पावरा, छगन पावरा , प्रताप पावरा व ईतर ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सदर उपक्रम नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या आदेशाने व सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव (प्रा.) लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक दिलवरसिंग पावरा, आकाश पावरा, सविता पावरा यांनी सदर उपक्रम यशस्वीतेकरिता प्रयत्न केले.

