भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकरी श्री जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत वाहक तारा अत्यंत खाली लोमकळत असल्याने शेतात मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भालेर येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता,महावितरणचे मात्र दुर्लक्ष
hanging-power-lines-in-bhaler-fields-pose-accident-risk-msedcl-ignores

या लोंबकळणाऱ्या तारांचा थेट संपर्क पिकांशी होत असल्याने जीवित तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोक्याबाबत त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि माहिती दिली. धोकादायक ठरणाऱ्या या तारा त्वरित उंच करून द्याव्यात, अशी मागणी ते गेल्या चार दिवसांपासून सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे करत आहेत. मात्र, इतके दिवस उलटूनही महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही, असा गंभीर आरोप शेतकरी पाटील यांनी केला आहे. शेतात काम करताना अथवा वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना किंवा पिकांना घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, महावितरणने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तात्काळ या तारांची दुरुस्ती करून त्या उंच कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: