मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या अर्जांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
(नंदुरबार) राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग मधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रवेश अर्जांना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
या योजनेत “शासकीय वसतिगृह योजना”, “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” आणि “पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” (शैक्षणिक वर्ष 2026-27) यांचा समावेश असून 12 वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील. या योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
पात्र व इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वेळेत शासनाच्या अधिकृत https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री. वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

